लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवरी सासरी आल्यानंतर हनिमूनच्या रात्री पत्नीने आपण गर्भवती असल्याचे सांगितले. नवऱ्याने पुढे पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बदायूँमधील अलापूर भागात घडली आहे.
पुष्पेंद्र याचे 22 जानेवारी रोजी लग्न झाले होते. दोघांचे एकमेकांशी लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते. ही दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या नात्यातली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांचा विवाह लावून दिला. पुष्पेंद्र आणि पत्नीचे लग्नाआधीपासूनच शारीरिक संबंध होते; मात्र तिने स्वतः गर्भवती झाल्याची माहिती पतीला दिली नव्हती. हनिमूनच्या रात्री पत्नीने आपण अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सागंतिले. ते कळल्यानंतर त्याला धक्का बसला. त्याने ती माहिती आपल्या कुटुंबीयांनाही दिली. त्यामुळे त्याला आजूबाजूच्या व्यक्ती टोमणेही मारू लागल्या. असे वेगवेगळे प्रकार तो सहन करू शकला नाही. अखेर त्याने आपल्या आईच्या मदतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली.
शाहजहांपूर जिल्ह्यातल्या गढिया रंगीन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या डभौरा सिमरा गावातले रामनिवास यांनी आपल्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीचा पती छज्जू उर्फ पुष्पेंद्र, मुलीची सासू कांता, सासरे यादराम, मोठा दीर रवी, नणंद अंजू, काका लालाराम आणि दिनेश यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी कारवाई करून नीरजचा पती छज्जू आणि सासू कांता यांना अटक केली. अन्य पाच आरोपी फरार आहेत.
दरम्यान, पुष्पेंद्र याने गुन्हा कबूल केला असून, लोकांचे टोमणे सहन न झाल्याने आईच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…
हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
The post हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

