रांची (छत्तीसगड) : एका व्यक्तीचे 43व्या वर्षी लग्न झाले. पण, हनिमूनच्या रात्री वराने नवरदेवाने नवरीकडे आधारकार्डची मागणी केली. पण, नवरी आधारकार्ड दाखवण्यासच नकार देत होती. नवरदेवाचा संशय खरा ठरला आणि नवरी ही लुटेरी दुल्हन निघाली.
छत्तीसगडमधील व्यापाऱ्याला आपल्या ४३ वर्षांच्या मुलाच्या लग्नासाठी हवी तशी मुलगी मिळत नव्हती. व्यापाऱ्याने सुरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीसमोर आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता मांडली. त्या व्यक्तीने व्यापाऱ्याला इंदूर येथे राहणाऱ्या एका महिला एजंटबद्दल सांगून तिच्याशी संपर्क साधायला सांगितला. सरला नावाच्या महिला एजंटने इंदूरमधील पूर्वा भारती जैन नावाच्या मुलीचा बायोडेटा पाठवला. यानंतर व्यक्तीचे वडील, बहीण आणि लहान भाऊ मुलगी पाहण्यासाठी इंदूरला गेले. मुलीचे वडील म्हणून शांतीलाल गांधी आणि मोठा भाऊ महावीर यांची ओळख करून देण्यात आली.
लग्नाचा संपूर्ण खर्च सुमारे 16 लाख रुपये मुलाचे कुटुंब उचलेल, या अटीवर लग्न ठरले. त्यानंतर एजंट सरला हिने वराकडे दीड लाख रुपये मागितले. लग्न ठरताच एजंट सरला हिने मुलाकडून 16 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याने सरलाला साडेपाच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम लग्नाच्या वेळी दिली जाईल, असे सांगितले. पूर्वा आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्य दुर्ग येथील वराच्या घरी पोहोचले. साखरपुडा झाला आणि मुलीकडच्या लोकांनी आणखी तीन लाख रुपये घेतले. हे लग्नही इंदूरमधील एका हॉटेलमध्ये पार पडले. त्याचा खर्चही वराकडून घेण्यात आला. उर्वरित 8.9 लाख रुपयांची रक्कमही तिथेच देण्यात आली. अशा प्रकारे एकूण 17.5 लाख रुपये वर पक्षाने खर्च केले.
हनिमूनच्या रात्री वधू-वर एकत्र खोलीत आले. पण, नवरदेवाला नवविवाहित पत्नीवर संशय होता. नवरदेवाने वधूला आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. पण, ती नकार देऊ लागली. त्यामुळे वराच्या मनातील शंका अधिकच वाढली. तो सतत आधार कार्ड दाखवायला सांगत होता, मात्र वधू टाळाटाळ करत होती. नवरदेवाला तिचं आधार कार्ड मिळाले. ते पाहून वर आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. आधार कार्डनुसार तिचे नाव वेगळेच होते. यानंतर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत लुटेरी दुल्हन असल्याचे समजले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…
हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
The post हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

