बीड: परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या युवतीची छेड काढली आहे. यानंतर डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे.
परळी शहरातील क्लिनिकमध्ये शुक्रवारी युवती तपासणीसाठी गेली होती. डॉक्टर यशवंत देशमुख यांनी विनयभंग केल्याचा आरोप युवतीने केला आहे. याच प्रकरणात युवतीसह तिच्या नातेवाईकांनी परळी पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यादरम्यान मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. अखेर पोलिसांनी तपास करून पीडित युवतीच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संबंधित डॉक्टर फरार असून, त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आज परळी बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास करून डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात कलम 74,75( 2) 79,3,1, नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…
धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…
डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ…
प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…
डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…
विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
The post हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

