Dailyhunt
विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य.

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य.

ठाणेः भिवंडीतील हायप्रोफाइल सोसायटीतील इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात विकृत युवक हस्तमैथून करून ते वीर्य महिलांच्या वाळत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे.

मोहम्मद रेयान मोहम्मद नफीज सिद्धीकी (वय 20) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 36 वर्षीय महिला या भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीत कुटुंबासह राहते. अटक आरोपी हा भिवंडीतील गैबीनगर भागात राहतो. 5 ऑक्टोबर रोजी तक्रारदार पीडित महिला राहत असलेल्या हायप्रोफाइल सोसायटीत आरोपी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सोसायटीमध्ये गुपचूप प्रवेश केला. त्यानंतर इमारतीच्या टेरेसवर जाऊन सोसायटीतील महिलांनी वाळत घातलेल्या अंतर वस्त्रावर हस्तमैथून करून वीर्य वस्त्रांवर टाकले. विशेष म्हणजे या विकृताचे घृणास्पद कृत्य टेरेस वरील सीसीटीव्हीत कैद झाले होते.

दरम्यान, सोसायटीमधील काही रहिवाशांनी कामा निमित्याने सीसीटीव्ही फुटेजची 29 नोव्हेंबर रोजी तपासणी केली असता त्या फुटेजमध्ये विकृत आरोपी हा महिलांच्या अंतर वस्त्रावर वीर्य टाकताना दिसून आला. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून विकृतावर 29 नोव्हेंबर रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अनुसार कलम 79, 329 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला भिवंडी शहरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…

विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

The post विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka