Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! चुलीवर मटण शिजत असतानाच मित्रांवर कोसळली वीज.

हृदयद्रावक! चुलीवर मटण शिजत असतानाच मित्रांवर कोसळली वीज.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाजवळ पार्टीसाठी गेलेल्या मित्रांच्या अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजरा तालुक्यात असलेल्या चिकोत्रा धरणाच्या बॅक वॉटरला पार्टीसाठी गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातला.

येथील निसर्गरम्य परिसरात पार्टीसाठी आलेल्या तरुणांवर वीज कोसळल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, चुलीवर मटण शिजवत असतानाच काळाने झडप घातली. या दुर्दैवी घटनेत अजित चौगुले (वय 24, रा. आरळगुंडी) या युवकाचा मृत्यू झाला आहे. रोहित मोरे गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अजित आणि रोहित यांच्यासह पाच मित्र पार्टीसाठी करत होते. एका झाडाच्या आडोशाला मित्रांनी चूल बनवली होती, अजित आणि रोहित या चुलीवर जेवण तयार करत असतानाच वीज कोसळली. त्यामुळेच, चुलीशेजारीच अजित चौगुले मृत्युमुखी पडला. तर, रोहित मोरे जखमी झाला असून त्याच्यावर गारगोटी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. धरणातील पाणी आणण्यासाठी इतर तीन मित्र गेल्याने तिघेजण बचावले. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

दरम्यान, अजित यांचा अवघ्या दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन भाऊ, आजी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नरतवडे गावात शोककळा पसरली आहे.

हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून…

हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…

हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka