Dailyhunt
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या.

हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या.

लातूर : लातूर शहरात राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील असलेली १७ वर्षांची मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात खोली नंबर २०५ मध्ये ती राहत होती. गुरुवारी सायंकाळी तिचा मृतदेह खोलीतल्या फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली. वसतीगृहाच्या कर्मचारी सारिका जाधव यांनी कॉलेज युवतीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेली मुलगी अभ्यासात हुशार होती. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत तिने १०० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर तिने लातूरमध्ये राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून अशाही परिस्थितीत तिने उज्ज्वल असे यश मिळवले होते. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…

कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट…

The post हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka