Dailyhunt
हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे.

हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे.

त्रपती संभाजीनगर : मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्यामुळे महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे.

सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करत होत्या. मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि त्यांचे शीर धडावेगळ झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मजुर महिलांना एकच खळबळ उडाली.

कोकिलाबाई यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. शेतीत भागत नसल्याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते. कोकिळाबेन यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…

The post हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka