अमरावती : डॉक्टर डॉ. पल्लवी कदम यांचा मेळघाट येथे झालेल्या बस अपघातात मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात त्यांचा विवाह झाला होता आणि त्या गर्भवती राहिल्या होत्या. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉ. पल्लवी कदम यांचा 11 जुलै रोजी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला होता. 8 दिवसांपूर्वीच त्यांना त्या गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. पल्लवी आई होणार म्हणून खूश होत्या. मात्र हा आनंद फार काळ टिकणार नाही असं स्वप्नातही वाटले नव्हते.
डॉ. पल्लवी या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागच्या दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. लग्नानंतर त्या अमरावतीला आल्या. त्यांनी रोज अमरावती ते चिचघाट असा खासगी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हाच निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. खासगी बसने जात असताना बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.
मेळघाट येथील बस अपघातातील 15 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अमरावतीमधील रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे. 8 जणांवर अचलपूर इथल्या उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये डॉ. प्रांजली रघुनाथ इंगळे राहणार अमरावती, राजेंद्र मोतीलाल पाल राहणार भोकरबर्डी, डॉ पल्लवी कदम, सी एच ओ चिचघाट, फुलवंती राजू काजळे या चार जणांचा समावेश आहे.
हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला…
हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…
हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…
The post हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

