Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे.

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे.

रभणी: मंगरूळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक सोपान शिवराम पालवे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्येपूर्वी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्षक सोपान पालवे यांनी चिठ्ठीत लिहीले आहे की, ‘संस्थेचे सचिव यांनी भरतीसाठी 20 लाख आणि त्यानंतर 20% वरून 60% टप्पा अनुदानावर नियुक्ती करण्यासाठी 5 लाख रुपये घेतले. परंतु, तरीही त्यांना काही महिन्याचे वेतन देण्यात आले नाही. 60% साठी पैसे देऊनही काही महिन्याचा पगार 20%प्रमाणे काढला.’ दरम्यान, अस्वस्थ झालेल्या व आर्थिक विवंचनेत सापडल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील सोपान पालवे यांनी आज परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाच्या शेजारी एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि एक चिट्ठी ही त्यांनी लिहून ठेवली. ज्यात ज्या शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत तिथले सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्याने त्यांचा कसा छळ केला. याबाबत त्यांनी लिहून ठेवले आहे. भरती करताना शेत विकून त्यांनी 20 लाख रुपये या सचिवाला दिले. त्यानंतर टप्पा अनुदान वाढवण्यासाठी ही 5 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे देऊनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. कधी 20% नि पैसे मिळायचे कधी मिळायचेच नाही, त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. पालवे यांच्या कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka