Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई.

बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई.

बीड : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली होती.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील आत्महत्याप्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा जाब दानवे यांनी विचारला. परिणामी विधान परिषदेत देखील याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुरवातीला तक्रार दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, बीड शहरातील कृष्ण अर्बन बँकेच्या आवारात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी नागरगोजे यांनी एक सुसाईड नोट सोशल माध्यमावर पोस्ट केली होती. अठरा वर्षांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर कोणीही या प्रकरणात तक्रार न देण्यासाठी पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र किमान वेतन कायदा डावलल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा. तसेच संबंधित संस्थाचालक यांच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असता या प्रकरणी आता हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

बीडमध्ये अमानुष मारहाण! 'खोक्या' आला समोर अन् सांगितलं…

वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…

बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka