Dailyhunt
हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या.

हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या.

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे याने पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर नैराश्यातून पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे.

त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) पत्नी राजश्री यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा आहे. भाऊसाहेबची पत्नी राजश्री कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यानंतर पहाटे त्या घरी परतल्या. त्यावेळी घरी नेण्यासाठी त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. परंतु भाऊसाहेब यांना फोन उचलला नाही. त्यामुळे त्या स्वत: घरी पोहोचल्या. घरी आल्यावर आशिषने दरवाजा उघडला. त्यांनी बाबा कुठे आहेत? अशी विचारणा आशिषकडे केली. त्यानंतर बेडरुममध्ये गेल्यावर मुलगी झोपलेली दिसली. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांना हादरा बसला. त्यानंतर किचनमध्ये आल्यावर भाऊसाहेब बेदरे यांनी गळफास घेतलेले दिसले. दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट मिळाली. त्यामध्ये कारण दिले आहे. आर्थिक विवंचनेतून जीवन संपवत असल्याचे भाऊसाहेब यांनी त्या नोटमध्ये म्हटले आहे. भाऊसाहेब बेदरे हे बांधकाम व्यवसायात आहेत. ते ठेके घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…

हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…

हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…

हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka