Dailyhunt
हृदयद्रावक!  शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू.

हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू.

ळगाव: घरासमोर खेळत असताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देवांशू सुनील सोनवणे असे मृत्युमुखी पडलेल्या बाळाचे नाव आहे. त्याच्यावर गेल्या दहा दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते.

देवांशूच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नांद्रा खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

देवांशू हा 11 जानेवारी रोजी रात्री घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ वॉकरमध्ये खेळत-खेळत गेला व त्याचा तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. या घटनेमध्ये, त्याच्या चेहऱ्यापासून ते पोटापर्यंतचा भाग गंभीररित्या भाजला गेला होता. 11 जानेवारी रोजी गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या देवांशूवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 20 जानेवारी रोजी या बालकाचा उपचार सुरू असताना रूग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नांद्रा गावात शोककळा पसरली आहे. या चिमुकल्याची गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे आपल्या कुटूंबासह राहतात. थंडीमुळे 11 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी शेकोटी पेटवली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात केले होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…

The post हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka