Dailyhunt
हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू.

हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू.

धुळे : धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावामध्ये ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा निर्माण झाली आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघण्यापूर्वीच अपघाताची घटना घडल्यामुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे.

ट्रॅक्टर तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये एक महिला देखील गंभीरित्या जखमी झाली आहे. तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेऊन पाहणी करुन ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तसेच, चालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची, एक 7 आणि एक 14 वर्षांची अशा तीन मुली आहेत. एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. गणेश विसर्जनादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…

हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…

हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…

The post हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka