Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात.

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात.

नाशिक : चिमुकल्या मुलीची हत्या केल्यानंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही, म्हणून आजोबा बघायला गेल्यानंतर घटना उघडकीस आली.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

विजय माणिक सहाने, पत्नी ज्ञानेश्वरी आणि मुलगी अनन्या (वय ९) अशी मृतांची नावे आहेत. विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गौळने गावचे असून ते पाथर्डी फाटा, सराफ नगर परिसरात राहत होते. त्यांनी मुलीला विष पाजल्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असं आहे. मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला.

विजय सहाने यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घेतले. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचा संशय आहे. शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही. त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितले तर आतून दरवाजा बंद होता. आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा समोर पती-पत्नीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले.

दरम्यान, सहाने कुटुंबियांवर कोणतेही कर्ज नाही. तरीही आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम, सोनं आढळून आले आहे. मात्र, आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…

Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka