Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू.

हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू.

त्रपती संभाजीनगर : आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींची नाव आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत आहे. रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र, सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसल्याने तिने परिसरात शोध घेणे सुरू केले. एका विहीरीमध्ये आईचा तरंगलेला मृतदेह दिसताच तिला धक्का बसला. याच धक्क्यातून मुलीने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

दरम्यान, माय-लेकींच्या मृत्युमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आईच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला…

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…

कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट…

हृदयद्रावक! घराची खिडकी उचकटली अन् वडिलांनी फोडला टाहो…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka