Dailyhunt
हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या.

हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या.

त्रपती संभाजीनगर : पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोयगावात घडली आहे.

यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी निलंबित केले होते. शिवाय, त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते. दीपक राऊत यांच्या 19 वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने रविवारी (ता. ७) तिचा मृत्यू झाला. मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्याने दीपक राऊत यांना धक्का बसला. मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर रात्री 2 वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, कुटूंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नागरपंचायतसमोर आणून ठेवले. जो पर्यत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगर पंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यांना निलंबित केल्याने त्यांच्यावर अशी वेळ ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

दीपक राऊत यांची मुलगी वैष्णवी हिचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर तिच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुरेसे पैसे नसल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात चांगले उपचार घेता आले नाहीत.

हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…

हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka