यवतमाळः निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय 35), अक्षरा निलेश चौधरी (वय 13) आणि आराध्य निलेश चौधरी (वय 11) अशी मृतांची नावे आहेत.
कवठाबाजार येथे एका कुटुंबातील एक महिला आणि त्यांच्या दोन पुतण्या निर्माल्य नदीपात्रात वाहण्यासाठी गावातील पैनगंगा नदीकाठावर पोहोचल्या. येथे निर्माल्य विसर्जित करताना एका चिमुकलीचा तोल गेला आणि ती पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगीही गेली. ती सुद्धा बुडू लागली. दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्या सुद्धा बुडाल्या.
तिघीही बुडाल्याची बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या होत्या. अखेर तिघींचेही मृतदेहच हाती लागले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अवैध रेती उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. यातच बुडून दोन मुलींसह एका काकूचा मृत्यू झाला. अवैध रेती उत्खननाला जबाबदार तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…
हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…
हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…
हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

