Dailyhunt
जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास.

जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास.

ळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत होते. यावेळी शिक्षक रवींद्र महाले यांनी दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र महाले हे वर्गात आढळून आले आहे. शाळा सुरू असतानाच ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मानसिक तणावातून शिक्षकाने टोकाची भूमिका घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रहिवासी होते. ते पाचोरा येथील सुपडू बहादू शाळेत कार्यरत असल्याने गेल्या काही वर्षापासून ते शहरातील गिरणा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत आहे. शिक्षक महाले यांनी एक दिवस आधी मुलीलाही घरी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…

पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास…

पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

हृदयद्रावक! जिम करुन घरी परतला अन् कोसळला; नुकताच साखरपुडा…

The post जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka