श्रीगरः जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले असून, 4 जवान हुतात्मा झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत 9 जवानांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 24 डिसेंबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले होते. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात 5 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर आज पुन्हा वाहन दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 जवान हुतात्मा झाले आहेत.
31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला होता. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता झाला होता. लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले होते. या अपघातातही 5 जवानांचा मृत्यू झाला होता.
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…
Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
The post जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

