Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी.

Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी.

खनौ (उत्तर प्रदेश) : हवाई दलातील जवानाचा मृतदेह तब्बल 56 वर्षांनी त्यांच्या घरी पोहचला. गेली ५६ वर्षे त्यांच्या परतीची वाट पाहणारी पत्नी आणि मुलाचे निधन झाले आहे. अखेर नातवाने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मलखान सिंह (रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.

मलखान सिंह यांचा मृतदेह तब्बल 56 वर्षांनंतर हिमाचल प्रदेशातील रोहतांग भागात सापडला आहे. मलखान सिंह हे हवाई दलामध्ये जवान होते. 7 फेब्रुवारी 1968 मध्ये एका विमान अपघातानंतर ते बेपत्ता झाले होते. या विमानात एकूण 102 जवान होते. मलखान सिंह यांच्या बॅच क्रमांकाच्या आधारे त्यांचा मृतदेह ओळखण्यात आला. शिवाय, आणखी तीन जवानांचे मृतदेह सुद्धा सापडले आहेत.

मलखान सिंह यांचे विमान अपघातावेळी वय 23 वर्षे होते. अपघातानंतर त्यांचा काहीच तपास लागत नव्हता. त्यामुळे त्यांचे आई-वडील, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य वर्षानुवर्षे त्यांच्या परतीकडे डोळे लावून बसले होते. पण, त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर, पत्नी शीलावती यांनी मलखान यांचे लहान बंधू चंद्रपाल सिंह यांच्याही विवाह केला. अपघात घडला त्यावेळी शीलावती गर्भवती होत्या, तसेच त्यांना एक दीड वर्षांचा मुलगाही होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक सैन्यदलाकडून मलखान सिंह यांचा मृतदेह मिळाल्याचा कुटुंबियांना निरोप आला आणि कुटुंबीय तसेच गावातील लोकांना अश्रू अनावर झाले. मलखान यांचा मृतदेह घरी आला होता, पण ते पाहण्यासाठी पत्नी आणि मुलगा नव्हते. दोघांचेही निधन झाले होते.

मलखान सिंह यांचे नातू गौतम यांनी मृतदेहावर फतेहपूरमध्ये अंत्यसंस्कार केले. यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. सरकारने मलखान सिंह यांना शहीद म्हणून दर्जा देण्याची मागणी कुटुंबातील सदस्य व गावातील नागरिकांनी केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka