Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक.

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक.

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे दोन जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लखनौ व बनारस येथे दोन्ही जवान हातामध्ये तिरंगा आणि भांडे घेऊन न्यायासाठी भीक मागत आहेत.

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स दोघांना न्याय द्यावा, अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांची लष्करामध्ये ११ वर्षे नोकरी झाली आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. चंदू चव्हाण यांनी मुंबई येथील अझाद मैदान व धुळे येथेही उपोषण केले होते. हरेंदर यादव यांनाही लष्करातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पण, अद्याप त्यांनाही न्याय मिळाला नाही, असे एस. के. यादव यांनी सांगितले.

चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे लखनौ व बनारस येथील रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अखिलेश यादव यांची त्यांनी भेट घेतली आहे. पण, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रस्त्यावर भीक मागण्याचे आंदोलन सुरूच राहणार आहे. पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिला सरकार नोकरी आणि राजकीय निवडणूक लढविण्यासाठी तिकीट देत आहे. पण, देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढून आणि पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतल्यानंतर आमच्या सारख्या जवानांवर भीक मागण्याची वेळ येत आहे. हा कोणता न्याय? देश भरातील अनेक जवानांवर अन्याय होत आहे. पण, ते पुढे येत नाहीत. अन्यथा विषय दाबला जातो. पण, आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहणार आहोत, असे चंदू चव्हाण आणि एस. के. यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे असे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka