श्रीनगर (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
दहशतवाद्यांनी रविवारी (ता. ९) सायंकाळी सव्वा सहा वाजता केलेल्या गोळीबारानंतर शिवखोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी 53 आसनी बस खोल दरीत कोसळली. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ ही घटना घडली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरु केली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी धाडसत्र सुरु आहे. हल्लेखोर याच परिसरात राजौरी, पूँछ आणि रियासी या भागात लपून राहणाऱ्यांपैकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आली आहे. बस रियासीवरुन कात्राच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी संध्याकाळी 6.15 मिनिटांनी संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस दरीत कोसळली. या दुर्घेटनेत दहा जणांना मृत्यू झालाय. 33 जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे पोलिस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

