कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला आनंद झाला होता. या रागातून मुंबई इंडियन्सच्या दोन चाहात्यांनी चेन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराजयजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर बंडोपंत बापूसो तिबिले (वय 63, रा. हणमंतवाडी) यांनी आनंद व्यक्त केला. याचा राग आल्यामुळे बळवंत महादेव झांजगे (वय 50) आणि सागर सदाशिव झांजगे (वय 35) यांनी बंडोपंत तिबिले यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे मुंबई इंडियन्सचे चाहाते आहेत, ते आयपीएलचा सामना पाहात होते. सनरायजर्स हैदराबादने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मुंबई इंडियन्स फलंदाजीसाठी उतरली होती रोहित शर्मा बाद झाला. याचवेळी तिथे बंडोपंत तिबिले पोहोचले. ते चेन्नई संघाचे चाहाते आहेत. रोहित शर्मा आऊट झाला, आता मुंबई हा सामना कसा जिंकणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून झांजगे आणि तिबिले यांचा वाद झाला. त्यानंतर त्या दोघांनी तिबिले यांच्यावर हल्ला केला. बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली, त्यानंतर सागर याने त्यांच्या डोक्यात फळी घातली. त्यामुळे तिबिले जागीच बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…
विनोदने पार्टी सुरू असताना हसत सेल्फीही काढला अन् एका क्षणात…
बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…
अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…
संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

