Dailyhunt
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड.

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड.

बीडः व्यावसायिकांना घाबरवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या पोलिस निरीक्षकाच्या घरी मोठे घबांड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घडावर धाड टाकली.

त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली आहे.

जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस निरीक्षकाने लाखो रुपयांची लाच घेतली होती. याप्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हरिभाऊ खाडे यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. यावेळी एका बॅगेत 500 च्या नोटांची बंडलं आढळून आली. हे सर्व पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना मशीनचा वापर करावा लागला. यावेळी खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गेल्यावर्षी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात बँकेचे प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. हा तपास सुरु असताना आरोपी बबन शिंदे यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांना 60 लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा या दोन व्यावसायिकांकडे वळवला होता.

हरिभाऊ खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. त्यांनी दोन्ही व्यावसायिकांना याप्रकरणात आरोपी करण्याची धमकी दिली. आरोपींच्या यादीत नाव येऊन द्यायचे नसेल तर दोघांनीही प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावेत, असे खाडे यांनी सांगितले होते. चार महिने खाडे पैशांसाठी या दोघांच्या मागे लागला होता. अखेर या दोघांनी प्रत्येकी 30 लाख रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर एका व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.

पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी व्यावसायिकाने पोलिस निरीक्षक खाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी खाडे पुण्यात होता. त्याने कुशल जैन या व्यापाऱ्याकडे 5 लाख रुपये दे, असे संबंधित व्यावसायिकाला सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने कुशल जैन याला पैसे दिले आणि एसीबीने त्याला अटक केली. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभुषण जाधवर हे दोघेही फरार झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड…

दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

Video: 'एसीपी'साठी लाखाची लाच घेणारा अडकला 'एसीबी'च्या जाळ्यात…

दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

The post लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka