बीड: बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू असून, घरामध्ये 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आले आहेत.
गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने राजेश सलगर यांना रंगेहात पकडले होते. याच अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
राजेश सलगर हे परळीतील गजानन इमारतीमध्ये राहतात. लाचलुचपत (एसीबी) विभागाच्या पथकाने आज (गुरुवार) त्यांच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, अंमलदार सुरेश सांगळे, सुदर्शन निकाळजे, स्नेहलकुमार कोरडे आणि गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी घरामध्ये घबाड मिळून आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर छापा टाकला होता. या झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबत 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत.
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड…
दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…
नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
The post शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

