Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार.

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार.

पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. भगवा चौक, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…

स्वरूप विष्णू जाधव यांचे लग्न ठरले होते. दिवाळीनंतर विवाह सोहळा पार पडणार होता. पण, विवाहापूर्वीच गळफास घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर कोल्हापूर येथील बावडा स्मशानभूमीत पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले. व्यायाम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या स्वरूप २०२३ साली पुणे पोलिस दलात भरती झाले. स्वारगेट पोलिस लाइनमध्ये ते राहत होते. रूममधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचा मृतदेह बावडा येथील मराठा कॉलनी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

दरम्यान, स्वरूप यांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता त्यांच्यावर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत. स्वरूप यांच्या मागे आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे.

पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…

पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka