Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या.

धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या.

पुणे: पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस लाईनमधील निवासी आणि खडक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सचिन हरीश्चंद्र सुर्वे (वय 40) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.

६) दुपारी घडली आहे. यामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

सचिन सुर्वे हे शिवाजीनगर येथे पोलिस वसाहतीतील नवीन बिल्डिंग मध्ये राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेले होते, त्यामुळे ते एकटेच घरी होते. सुर्वे यांनी शुक्रवारी दुपारी गळफास घेतल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आणि सुर्वे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. सुर्वे यांची मुलगी दहावीमध्ये शिकत आहे. या घटनेने त्यांच्या कुटूंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सुर्वे यांची नुकतीच कोंढवा पोलिस ठाण्यात बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

The post धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka