Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या.

महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या.

मरावती : नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुभांगी निलेश तायवाडे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत होत्या. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाची चिमुकली अशा दोन मुली आहेत. लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीच्या आई आणि वडिलांनी केला आहे.

आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले, असा आरोप मृत शुभांगी हिच्या आईने केला आहे. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासूला गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सध्या राज्यभर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच राज्यात विवाहीत महिलांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत.

नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन…

पुणे शहरात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; संपवलं जीवन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka