Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं.

महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं.

खनौ (उत्तर प्रदेश) : रामपूरच्या महिला पोलिस ठाण्यात तैनात असलेली लेडी कॉन्स्टेबल रिंकी एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या होत्या. पण, सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर हजर झाल्या नाहीत. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना रिंकीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

रिंकी 14 ऑक्टोबर रोजी ड्युटीवर रुजू होणार होत्या मात्र त्या परतल्याच नाही. त्यांचे पती सोनू कुमार (रा. बिजनौर) हे देखील पोलिसात आहेत. रामपूरमधील स्पेशल ब्रँचमध्ये तैनात आहेत. त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात रिंकी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना रिंकीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला आहे.

पोलिस रिंकीच्या शोधात असताना 17 ऑक्टोबर रोजी त्यांना मुरादाबादमधील रामगंगा नदीच्या काठावर झुडपात एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावर एका महिलेचे शीर सापडले. मृतदेहाची ओळख लेडी कॉन्स्टेबल रिंकी हिची होती. रामपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस, रिंकीचा पती सोनू आणि कुटुंबीयांसह शवविच्छेदनाच्या ठिकाणी पोहोचले. पतीला मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मात्र आई-वडिलांनी मृतदेह रिंकीचा असल्याचे सांगितले. एसपी सिटी रणविजय सिंह यांनी सांगितलं की, ‘लेडी कॉन्स्टेबल रया प्रकरणाचा तपास करत आहेत. लेडी कॉन्स्टेबलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.’

बिजनौरच्या चांदपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दरबाद गावात राहणाऱ्या रिंकीचा विवाह 2013 मध्ये बिजनौरच्या याच पोलिस स्टेशन हद्दीतील रायपूर गावातील सोनू कुमारसोबत झाला होता. रिंकीची आई हरवती यांनी आरोप केला आहे की, ‘जावई सोनू कुमार तिच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि तिला रोज मारहाण करत असे. रिंकीचे ओमपालसोबत प्रेमसंबंध असल्याचा सोनू कुमारला संशय होता.’ दरम्यान, रिंकीच्या कुटुंबीयांनी रामपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिंकीचा पती सोनू कुमार याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सोनू कुमारच्या मेहुण्यालाही अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka