Dailyhunt
मैत्रिणीला अडवून म्हणाला; दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय संबंध?

मैत्रिणीला अडवून म्हणाला; दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय संबंध?

पुणे : मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?' अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण केली. युवतीला मारहाण केल्यामुळे तिचा जबडा फॅक्चर झाल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

युवतीने (वय २३, रा. वानवडी) शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत. दिवाळीपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दुपारी बाराच्या सुमारास तरुणी ही तिच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात असताना रोहनने पाहिले होते. त्यानंतर त्याने रागाच्या भरात तिचा रस्ता अडवून तिला मारहाण केली. त्याचबरोबर, त्याने तिच्या चेहर्‍यावर बुक्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत युवतीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर युवतीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर युवतीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

The post मैत्रिणीला अडवून म्हणाला; दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय संबंध? appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka