Dailyhunt
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video.

मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video.

मुंबई : न्यायालयीन सुनावणी सुरू असताना स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण, हा प्रकार केवळ एकदाच घडला नाहीये, तर दोन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे.

पहिल्यांदा अशाप्रकारे व्हिडीओ सुरू झाल्यानंतर न्यायालयाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञातानं कोर्टाची वेबसाईट हॅक करून हा प्रकार केल्याचा दावा केला जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई येथील राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या न्यायालयात हा प्रकार घडला आहे. १२ डिसेंबर आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस काही मिनिटांसाठी स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला होता. अज्ञात व्यक्तीने न्यायालयाची यंत्रणा हॅक करून हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने मुंबईतील कफ परेड पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंह यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ डिसेंबरला दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी कोर्टाच्या वेबसाईटवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला होता. जवळपास तीन मिनिटं ही क्लिप सुरू होती. हॅकरने कोर्टाची वेबसाईट हॅक करून हा प्रकार केला होता. १७ डिसेंबरला पुन्हा याच नावाने न्यायालयातील स्क्रीनवर अश्लील क्लिप सुरू करण्यात आली. जवळपास ११ मिनिटं ही क्लिप सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या नावाच्या आणखी एका व्यक्तीने कोर्टाची वेबसाईट हॅक करून कोर्ट क्रमांक ४ आणि कोर्ट क्रमांक ५ च्या स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ प्ले करत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. हा प्रकार समोर आल्यानंतर कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची आयपी अॅड्रेसही पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी…

मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला…

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

The post मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka