Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह.

नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह.

नागपूर: नागपूरमधील कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खानीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या आहे की दुर्घटना आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खानीमध्ये ही घटना घडली आहे. आज दुपारी पाच जणाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. रोशनी चंद्रकांत चौधरी (वय 32 रा. धुळे) तीचा मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय 12), मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय 10 वर्षे रा. धुळे),

बहीण रज्जो राऊत (वय 25 रा. नागपूर) आणि इतिराज अन्सारी (वय 20 वर्षे राहणार नागपूर ) अशी मृतांची नावे आहेत. हे पाचही जण रविवार असल्याने त्या भागात फिरण्यासाठी आले होते. पण पाचही जण रात्र झाली तरी घरी परतले नव्हते. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार नागपूर येथील दोन पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवली होती.

शोध घेत असताना पोलिसांना कुही तालुक्यातील खानीजवळचे लोकेशन मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यातून पाच मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक दृष्ट्या हे सगळे फिरायला आले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
एहतेशाम अन्सारी, 26 वर्ष
रोशनी चौधरी, 32 वर्ष
अंजली चौधरी, 25 वर्ष
मोहित चौधरी, 10 वर्ष
लक्ष्मी चौधरी, 8 वर्ष

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…

नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka