नाशिक : नाशिक जिल्ह्याचील कळवण तालुक्यात एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे (वय २०) आणि गीतांजली एखंडे (वय १३) मृत मुलींची नावे आहेत.
कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे आणि गीतांजली एखंडे अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावे आहेत. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत हे मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान या प्रकरणात भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, एकाच विहिरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा घातपात आहे की आत्महत्या? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
The post नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

