नाशिक : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकोतील पांगरे मळा बडदे नगर येथे घडली आहे. हेमंत पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे.
पतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जीवन संपवले असून संशयित पत्नीसह ४ जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिर्यादी प्रभाकर पवार (वय 67) यांनी अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा हेमंत प्रभाकर पवार (वय 38, रा.पांगरे मळा, बडदे नगर) याने राहत्या घरात 14 ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात पत्नी सुगंधा पवार हिच्या मानसिक त्रास कंटाळून तसेच सासरे हरी देवरे, सासू रत्ना देवरे (रा.सातपूर) साली संध्या मांडवळे (रा.पुणे) तिची मैत्रीण मोना जेऊघाले (रा.नाशिक) यांनी प्रचंड त्रास दिला असे म्हणत आत्महत्या केली. संशयित पाचही जणांवर अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांची मागणी व मानसिक छळ करत पत्नी सुगंधा पवार हिने व सासरचे व्यक्ती यांनी त्याच्याकडे 1 लाख रुपये मागितले होते असा आरोप चिठ्ठीत केला आहे. त्यानंतर पत्नीने आई वडीलांपासून वेगळे रहायचे असेही सांगितले होते. मात्र, वाद वाढतच होता. मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर हेमंतने जीवन संपविले. तो शेअर मार्केटींगचे क्लास घेत होता. त्याच्या मागे आई-वडील, बहीण व एक मुलगी असा परिवार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…
महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…
धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
The post नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

