Dailyhunt
नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं.

नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं.

नाशिक: मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करत पत्नीचा खून केल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी (ता. ४) मुलगा सकाळी कामावर गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी छत्रगुन गोरे (वय ५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील छत्रगुनने दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली.

मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार पतीस पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.

नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…

नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह…

The post नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka