Dailyhunt
नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह.

नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह.

नाशिक : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात व्यावसायिक असलेल्या बापलेकाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. विषारी औषध सेवन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहरातील काळाराम मंदिरालगत असलेल्या रामराज्य संकुलात राहणाऱ्या बापलेकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रशांत आत्माराम गुरव (वय ४९) आणि अभिषेक प्रशांत गुरव (वय २८) अशी मृत बापलेकांची नावं आहेत. विषारी औषध सेवन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

घरात दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी केली असता कुठेही सुसाईड नोट आढळून आली नाही. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आर्थिक व्यवहारातून बापलेकाने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचवटी पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली 'भाईगिरी'…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…

नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

The post नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka