Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग.

नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग.

नाशिक : नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात एका युवकाने बस स्थानकावर स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने हॅप्पी होली म्हणत संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि आग लावली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शुभम जगताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत विजय गेहलोत हे ६० टक्के भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेहलोत हे नाशिकच्या ठक्कर बस स्थानक परिसरात सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. आरोपी शुभम याला दारुचे व्यसन आहे. तो अनेकदा दारु पिऊन बस स्थानक परिसरात यायचा. गेहलोत यांनी शुभमला हटकलं. तू दारू पिऊन या परिसरात येऊ नको, असे सांगितले. याचाच राग शुभमला आला. त्यामुळे त्याने थेट सुरक्षारक्षक असलेल्या गेहलोत यांना जीवे मारण्याचा कट रचला.

घटनेच्या दिवशी तो एका बाटलीत पॅट्रोल घेऊन बस स्थानकावर आला. त्यांनी अचानक हॅप्पी होली म्हणत गेहलोत यांच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि काही कळायच्या आत गेहलोत यांच्या अंगाला आग लावली. या घटनेत गेहलोत ६० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…

The post नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka