Dailyhunt
नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात.

नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात.

नाशिक : नाशिक शहरातील रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका कॉलेजमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत.

इम्रान हानीफ पठाण (वय 28 रा. साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहरात दिवसा व रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदिप कर्णीक यांनी दिले होते. त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत होते. भद्रकाली पोलिस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक पद्धतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बाबत माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने आरोपी इम्रान पठाण याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच एक महिन्यापूर्वी रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका या कॉलेजमधील कार्यालयाच्या बंद दाराचे कुलूप तोडून घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून 23 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे करीत आहेत.

संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त परिमंडळ-1 किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, पोलिस अंमलदार सतीश साळुंके, कय्युम सैय्यद, अविनास जुंद्रे, नितीन भामरे, निलेश विखे, दयानंद सोनवणे, नारायण गवळी यांच्या पथकाने केली.

नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…

नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…

नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka