Dailyhunt
नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली 'भाईगिरी'.

नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली 'भाईगिरी'.

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना पोलिस अंमलदार विशाल झगडे याने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये आपल्या दोघा साथीदारांसह जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॉटेलमधील वेटर सीराज शेख यास बोलावून तंदूर रोटी मागितली होती. त्यावेळी वेटरने तंदूर रोटी संपल्याचे सांगताच विशाल झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल झगडेने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर रोखली आणि त्यास धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित पोलिस विशाल झगडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घेतली आहे. संशयित पोलिस अंमलदार विशाल झगडे यास निलंबित केले आहे. पोलिसांनी झगडे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…

नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

The post नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली ‘भाईगिरी’… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka