नाशिक : नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली असून, त्यांनी आता थेट खादी वर्दीवरच हात उचलल्याने खळबळ उडाली आहे. सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडे मळा येथे शुक्रवारी (ता. 2) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात बांधकामावरून वादावादी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेवून नियत्रण कक्ष येथील राखीव पोलिस फोर्स घेवुन पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी घटना स्थळ गाठले. यावेळी बांधकाम व्यवसाईक व जागा मालकाचे नातलग यांच्यात हा वाद सुरू होता. मालक सचिन जानी आणि महानगर पालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे कर्मचाऱ्यांना घेऊन आले. त्यावेळी तेथे उपस्थित बेबी गाडे यांनी महापालिका अधिकारी आणि इतरांना काम करण्यास विरोध केला. मजूर गाळा उघडण्याचा प्रयत्न करत असताना बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे या संशयितांनी मजुरांना मारहाण केली. यावेळी उपनिरीक्षक उंडे यांच्यासमवेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार हे अन्य सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपस्थित जमावाला समजावत असताना त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. संशयित सुजाता उर्फ बेबी गाडे हिने उपनिरीक्षक उंडे यांच्या हाताला नखाने ओरबाडून जखमी केले. त्यांना मारहाण केली. अश्विनी पवार यांच्या हातालाही नखाने ओरबाडले. भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांनीही पवार यांना मारहाण केली.
घटनास्थळी ठिकाणी १०० हून अधिक लोक जमा होते. त्यामुळे स्वत: जादा कुमक घेऊन गेलो. महापालिका आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. आपल्यावर चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली. दरम्यान, नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, पोलिसांची जरब राहिली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नाशिक पोलिसांनी कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड अन्…
नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…
नाशिक पोलिसांना पेट्रोलिंग करताना कार संशयास्पद आढळून आली अन्…
नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…
नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

