नाशिक: नाशिकमध्ये हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली. शिवाय, जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या. संबंधित मिरवणुकीची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!
एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर रोड परिसरात पाटणकरच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचा सहभाग असल्याचे पाहायला मिळाले. या मिरवणुकीत चारचाकी महिंद्र एक्सयुव्ही 300 आणि 10 ते 15 बाईकचा सहभागी होत्या. शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कुख्यात गुंडाची मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर परिसर दणाणून गेला होता. याशिवाय, मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. या सगळ्यांकडून ‘बॉस इज बॅक’च्या घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…
नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…
नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

