Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा.

नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा.

नाशिक : मनमाड पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे यांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनमाड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे येवला येथे बंदोबस्त करून मनमाडकडे येत असताना त्यांचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला.

यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले व अधिक उपचारासाठी तात्काळ नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, येवल्यात विविध घटनांमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यासह दोन जणांचे गळ्याला कापले गेल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. कोटमगाव येथे झालेल्या घटनेत देवराज कोटमे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले, तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजा मुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत. तर तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊत या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून जखम झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत. प्रशासनाने आवाहन करूनही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात आहे. नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच मांजाने गळा चिरल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली पाथर्डी परिसरात घडली आहे. सोनू किसन धोत्रे (वय २३) अस मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…

पोलिस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजामुळे कापला गेला गळा…

पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…

The post नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka