पुणे : अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे.
पुण्यात तीन दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरूणाला ३२ टाके पडले आहेत. कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे १५ दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन दुपारी घरी परत चालले होते. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावर नायलॉन मांज्याने गळ्याला विळखा घातल्याने त्यांचा गळा चिरला. त्यांना तब्बल १५ टाके पडले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय. पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पाहता, पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली. त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीत आपलं मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो, यावर पालकांना लक्ष ठेवावं लागणार आहे. तसे न केल्यास थेट आई वडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यामुळे आई वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मांजामुळे गळा कापून अनेकांना आयुष्यभराची दुखापत होत आहे. हे सगळे अपघात पाहता आता पालकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी याबाबतची पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे.
पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…
डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर
The post पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

