Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच.

नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच.

नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांनी संबंधित टोळक्याला हटकले. त्यांनी हटकल्याचा राग मनात ठेवून संतापलेल्या टोळक्याने थेट त्यांच्यावरच चाकू हल्ला केला. नामदेव सोनवणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे जखमी असताना सुद्धा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना सोनवणे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७, रा. धात्रक फाटा, नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनवणे हे शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास दिंडोरी नाक्यावरून घरी जात होते. यावेळी दिंडोरी नाका येथील गीता हार्डवेअर समोर संशयित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव उर्फ गटया, (रा. अवधूत वाडी, पंचवटी, नाशिक) हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. यावेळी सोनवणे यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसला आणि हाताला झटका देत पळून जाऊ लागला.

सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता थेट संशयितांचा पाठलाग करून त्याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनवणे यांनी तात्काळ रुग्नालयात जाऊन उपचार सुरु केले. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…

नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka