लखनौ (उत्तर प्रदेश) : एका नवविवाहितेच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्यांनी सासरचे घरच पेटवले. या घटनेत नवविवाहितेच्या सासू-सासऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रयागराज येथील मुठ्ठीगंज भागात 18 मार्च रोजी रात्री नवविवाहिता आंशिका केसरवाणी हिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. धुमनगंजमधील झालवा येथे राहणाऱ्या आंशिका हिचे लग्न मुठ्ठीगंज येथील व्यापारी अंशूशी झाले होते. आंशिकाच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक तिच्या सासरच्या घरी पोहोचले, तिथे तिच्या सासरच्या मंडळींमध्ये आणि तिच्या माहेरच्या कुटुंबात भांडण झाले. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर आंशिकाची हत्या केल्याचा आरोप केला. दरम्यान, आंशिकाच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींना घरात कोंडून घर पेटवून दिल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये दोन लोकांचा (आंशिकाचे सासरे आणि सासू) मृत्यू झाला आहे.
प्रयागराज डीसीपी (शहर) दीपक भुकर यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 11 वाजता अंशिका केसरवानी नावाच्या महिलेने आत्महत्या केल्याचा फोन आला होता. यावेळी माहेरचे आणि सासरचे लोकही उपस्थित होते. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा दोन्ही बाजूचे लोक आपापसात भांडत होते. त्यादरम्यान माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींच्या घराला आग लावल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 5 जणांचा जीव वाचवून अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पहाटे 3 वाजता संपूर्ण घराची झडती घेतली असता त्यात दोन मृतदेह आढळून आले. ज्यामध्ये एक मृतदेह नवविवाहित महिलेचे सासरे राजेंद्र केसरवाणी यांचा आणि दुसरा मृतदेह सासू शोभा देवी यांचा होता. या प्रकरणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे…
धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार…
पुणे: 'मुळशी पॅटर्न'मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
The post नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

