हिंगोली : हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदिनी प्रतीक करवा (रा. रिसोड, जि. वाशिम) असे मृत महिलेचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे. तिने बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे दाजीला केलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे. त्यामध्ये आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये असे म्हणत दुसरे कारण असल्याचा उल्लेख केला आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर येथील नंदिनी विरेंद्र तिवारी हिचे दोन महिन्यांपूर्वीच रिसोड येथील प्रतिक कारवा सोबत लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी नंदिनी तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. पण शनिवारी सकाळी अचानक घरातून निघून गेल्यानंतर ती लवकर परतली नाही. तेव्हा कुटुंबिय तिचा शोध घेत होते. सकाळी घरातून गेल्यानंतर नंदिनीने तिच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला. त्यात तिने आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितले. तिने शहरातील एका लॉजवर रूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला. पख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे.
‘दिदी तू खूप सपोर्ट केलास, मी खूप प्रयत्न केला पण माझ्याकडून काहीच होत नाहीय. मी फक्त माझ्यासाठी हे पाऊल उचलतेय. यात कुणाचीच चूक नाही. माझ्या पतीनेही मला चांगली साथ दिली. पण मी दुसऱ्या काही कारणाने चांगली राहू शकत नाही,’ असा उल्लेख शेवटच्या मेसेजमध्ये नंदिनीने केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
संगमनेर हादरलं! आठवडाभरात वाडेकर कुटुंबच संपलं; चौघांचीही आत्महत्या…
धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…
नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
The post नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

