लखनौ (उत्तर प्रदेश): कारमध्ये पत्नी तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना पतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीलाच उलट मारहाण केल्याची घटना घडली आहे.
लखनौ शहरातील आशियाना रेस्टॉरंटबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पतीने पत्नीला प्रियकरासोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर या तिघांमध्ये वाद सुरू झाला. मग प्रियकराने प्रेयसीच्या पतीला मारहाण केली आणि तो पळून गेला. पीडित पतीने पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पतीने दिलेल्या माहितीनुसार, ’20 ऑगस्ट रोजी तो आशियाना येथे कामानिमित्त गेला होता. तेथून परतत असताना स्पायसी हब रेस्टॉरंटच्या जवळ पोहोचताच त्याला त्याच्या पत्नीची कार तिथे उभी दिसली. त्याला संशय आला. तो कारजवळ गेला; पण कारमधील दृश्य पाहून त्याला जबर धक्का बसला. कारमध्ये त्याची पत्नी तिचा प्रियकर आदित्य उपाध्याय याच्या सोबत बसली होती. प्रियकरासोबत पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून पती संतापला आणि त्याने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
भर रस्त्यात बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नागरिकांनी गर्दी केली होती. वाद वाढताच कारमध्ये बसलेला आदित्य उपाध्याय कारचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; पण पतीने विरोध करताच आदित्यने त्याला मारहाण केली आणि त्याला धक्का देऊन फरार झाला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
Video: पत्नी गरोदर अन् नवरा सुमद्र किनारी मैत्रिणीसोबत; रंगेहात पकडले…
पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
The post पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

