लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने न्यायालयात आपला जबाब नोंदवला आहे.
आयआयटी विद्यार्थिनीने कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला, जो एफआयरमध्ये नोंद आहे. यामध्ये मोहसीनला केलेल्या पहिल्या मेसेजपासून शेवटच्या मेसेजपर्यंतचा उल्लेख आहे. पीडित युवतीने न्यायालयात सांगितले की, ‘मोहसीन खानने आपल्याला त्याच्यात आणि पत्नीतील नात्यात दुरावा असल्याचे म्हटले होते. यामुळेच ते दोघे वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपतात. खोटे सांगून मोहसीनने आपल्यासह दुष्कृत्य केलं. विरोध केला असता आपण लवकरच पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे त्याने सांगितले.’
बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी टीमने आयआयटी कानपूरमध्ये जाऊन इतर विद्यार्थ्यांचा जबाबही नोंदवला आहे. आयआयटी हॉस्टेलच्या जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये मोहसीन दिसले आहेत. काही ठिकाणी पीडित आणि आरोपी एकत्र दिसले आहेत. तसेच आयआयटीतील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांमधून आत येताना आणि बाहेर जाताना पाहिल्याचेही अनेक साक्षीदार आहेत.
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांनी अद्याप बलात्कार आरोपी मोहसीन खान यांना अटक केली नाही. दुसरीकडे पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यात बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे.
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…
धक्कादायक! आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची पोलिस अधिकाऱ्याने काढली अंतर्वस्त्रे अन्…
The post पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

