Dailyhunt
पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी.

पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी.

हमदनगर : राज्यात सुरू असलेली पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.

खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलिस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागणार आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.


पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

दरम्यान, राज्यात उद्यापासून म्हणजेच, 19 जून 2024 पासून राज्यभरात पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलिस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस शिपाई पदांसाठी उद्यापासून अहमदनगरमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई, बँड पथक आणि चालक पदासाठी उद्या (19 जून) पहाटे पाच वाजल्यापासून पोलिस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलिस दलातील शिपाई 25, तर चालकाच्या 39 जागा रिक्त आहेत. यातील पोलिस शिपाई पदासाठीच्या 25 जागांपैकी तीन जागा बैंड पथकासाठी राखीव आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

शिपाई आणि बँड्समन पदासाठी 1947 ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत. चालक पोलिस शिपाई पदासाठी 3 हजार 909 अर्ज प्राप्त झालेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे काही व्यत्यय आल्यास उमेदवारांना नंतरची तारीख कळविण्यात येईल. याशिवाय एकाच उमेदवाराला एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असतील, अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. परंतु, उमेदवारांनी याबाबत अर्ज करावा लागेल असं पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka