Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की.

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलिस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी आज ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता.

त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

नेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडीओत केला आहे. बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असे मृत बालाजी जाधव व्हिडीओत म्हटले आहे.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

दरम्यान, पेवा या गावात 15 दिवसापूर्वी एकाचा खून झाला होता. जातीय वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते, याच घटनेतील आरोपीबद्दल पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली, असा वरिष्ठ पोलिसांचा समज होता. त्यातून पोलिस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केली होती. पण, आपल्यावर खोटा आरोप होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आता होत आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणला होता. शिवाय, संबंधित वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी व बालाजी यांच्या कुटुंबीयांना केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…

'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

The post पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka